स्पीडी ‘डिफ्रॅगलर’
कॉम्प्युटर जरा स्लो वाटायला लागला की आपण डिस्क डिफ्रॅगमेंट करायला घेतो. हार्डडिस्कवर वेगवेगळ्या पार्टिशन्सवर असंख्य फाईल्स सतत स्टोअर केल्या जात असतात, अॅक्सेस केल्या जात असतात किंवा डिलीट केल्या जात असतात. कॉम्प्युटरच्या भाषेत शेकडो फाईल्स ठराविक हार्डडिस्कवरील ठराविक जागा व्यापून बसेलेल्या असतात. यातील काही फाईल्स डिलीट झाल्या तर त्यांची जागा भरण्यासाठी कॉम्प्युटर दिलेल्या सूचनांनुसार काम करत असतो. पण काही वेळा त्यात अडचणी आल्या तर ती जागा रिकामी राहते. अशा अनेक जागा रिकाम्या राहिल्या तर हार्डडिस्कची इफेक्टिव्ह मेमरी कमी होते. अशावेळी या सगळ्या जागा मोकळ्या कराव्या लागतात. त्यास डिफ्रॅगमेंटेशन म्हणतात. कॉम्प्युटरमध्ये डिस्क डिफ्रॅगमेंटेशनची सोय असते. पण डिस्क डिफ्रॅगमेंट होण्यासाठी प्रचंड वेळ लागतो. एखादे फोल्डर किंवा फाईल डिफ्रॅगमेंट करायची असेल तर?
फाईल किंवा फोल्डर डिफ्रॅगमेंटेशनची गरज ओळखून पिरिफॉर्म या कंपनीने (सीसीक्लीनरचे निमर्माते) डिफ्रॅगलर हे अॅप्लीकेशन तयार केले. डिफ्रॅगलर विंडोज अॉपरेटिंग सिस्टिमवर (व्हिस्टापर्यंतच्या सर्व व्हर्जन्सवर) रन होते. डिफ्रॅगलरचा वापर करून तुम्ही एखादे विशिष्ट फोल्डर किंवा फाईल काही सेकंदात डिफ्रॅगमेंट करू शकता. तुम्हाला संपूर्ण ड्राईव्ह डिफ्रॅगमेंट करायचा असेल तर ते देखील याद्वारे करणे शक्य आहे. डिफ्रॅगलर डाऊनलोड करून इन्स्टॉल करा. अॅप्लीकेशन रन केल्यानंतर ड्राईव्ह सिलेक्ट करा. अॅनालाईझ केल्यानंतर त्या ड्राईव्हसंदर्भातील डिफ्रॅगमेंटेशनची माहिती दिसेल. आता तुम्ही थेट ड्राईव्ह डिफ्रॅगमेंट करू शकता किंवा त्यातील फाईल सिलेक्ट करून राईट-क्लिक करा. डिफ्रॅग म्हटल्यानंतर त्या फाईल्स डिफ्रॅगमेंट होतील.
डिफ्रॅगलर कसे वापरावे?
0 comments »
Post a Comment