, ,

हवे ते म्युझिक करा चुटकीसरशी रेकॉर्ड!

October 3, 2008 Leave a Comment

Web 18 च्या In.com या नव्या पोर्टलच्या जाहिराती तुम्ही सध्या पाहत असाल. टेलिव्हिजन आणि अॉनलाईन मीडियातून या पोर्टलचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. अॉडिओ, व्हिडीओ, गेम्स, मेल, न्यूज, सर्च अशा सर्व गोष्टी एका ठिकाणी आणून अधिकाधिक लोकांच्या जवळ जाण्याचा In.com चा प्रयत्न दिसतोय. असो. ही साईट एक्स्प्लोअर करताना मला आजच्या पोस्टचा विषय सुचला. तो म्हणजे स्ट्रिमिंग रेकॉर्डरचा - अथर्थात अॉनलाईन प्ले होणारे गाणे रेकॉर्ड करून एमपीथ्री किंवा इतर फॉरमॅटमध्ये सेव्ह करणारी सेवा (किंवा अॅप्लीकेशन).

यापूवर्वीच्या एका पोस्टमध्येमी गाणी डाऊनलोड न करता अॉनलाईन एेकण्याबद्दल (वाचा - नवे धोरणः एेका आणि विसरा) माहिती दिली होती. काही वेळा एखादे गाणे आपल्याला डाऊनलोड करून हवे असते किंवा त्याचा दुसरीकडे कुठेतरी वापर करावयाचा असतो. त्यासाठी संबंधित गाण्याची एमपीथ्री फाईल आपल्याजवळ असावी लागते. काही वेळा एखाद्या व्हिडिओमधील विशिष्ट म्युझिक पीस आपल्याला हवा असतो आणि तो व्हिडिओ डाऊनलोडेबल नसतो. अशा वेळी अॉनलाईन प्ले होणारा कोणताही आवाज रेकॉर्ड करणाऱ्या दोन सेवा आपण वापरू शकतो.

फ्रीकॉर्डर टूलबारःयाहू किंवा गुगल टूलबारप्रमाणे फ्रीकॉर्डर टूलबार फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. फ्रीकॉर्डर टूलबार विंडोजच्या सर्व व्हर्जन्सवर (व्हिस्टासह) इंटरनेट एक्स्प्लोअरर आणि फायरफॉक्स या ब्राऊजरमध्ये वापरता येऊ शकतो. साऊंडकार्डच्या साह्याने फ्रीकॉर्डर स्ट्रिमिंग साऊंड्स रेकॉर्ड करण्याचे काम करतो. मायक्रोफोन आणि लाईन-इन इनपुट वापरूनही रेकॉर्ड करणे शक्य आहे. फ्रीकॉर्डर टूलबार इन्स्टॉल केल्यानंतर सेटिंग्जमध्ये जाऊन रेकॉर्डिंग सोर्स सिलेक्ट करा.या ठिकाणी Record From Freecorder Audio Driver हा अॉप्शन डिफॉल्ट सेट केलेला असेल. हा अॉप्शन वापरून तुमच्या स्पीकरमधून येणारा कोणताही आवाज तुम्ही रेकॉर्ड करू शकता. इतर सोर्स वापरायचे असल्यास हा अॉप्शन डिसिलेक्ट करून इतर दोन अॉप्शन्सपैकी एक सिलेक्ट करू शकता. त्यानंतर अाऊटपूट फॉरमॅट (एमपीथ्री किंवा डब्लूएव्ही) आणि डेस्टिनेशन आदी अॉप्शन्स निवडा. आता तुम्ही एखादे गाणे स्ट्रीम करून रेकॉर्डवर क्लिक करा. साऊंड म्यूट करूनही तुम्ही गाणे रेकॉर्ड करू शकता. स्टॉप म्हटल्यावर निवडलेल्या फॉरमॅटमध्ये फाईल सेव्ह होईल.

फ्रीकॉर्डर टूलबार डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

एमपीथ्री माय एमपीथ्री रेकॉर्डरः
ब्राऊजरबेस्ड रेकॉर्डर नको असल्यास किंवा ब्राऊजरमध्ये टूलबार्सची गदर्दी नको असल्यास तुम्ही डेस्कटॉप अॅप्लीकेशन वापरू शकता. स्ट्रिमिंग साऊंड्स रेकॉर्ड करण्यासाठी एमपीथ्री माय एमपीथ्री रेकॉर्डरचा वापर करता येतो. तथापि, गाणे रेकॉर्ड करताना साऊंड म्यूट करता येत नाही. स्ट्रिमिंग साऊंड रेकॉर्ड करण्यापूर्वी सोर्स सेटिंग्जमध्ये जाऊन स्टिरिओ मिक्स हा अॉप्शन सिलेक्ट करा. रेकॉर्डिंग संपल्यावर स्टॉपवर क्लिक करा. आता तुम्ही रेकॉर्डेड साऊंड एमपीथ्री किंवा डब्लूएव्ही फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकता.

एमपीथ्री माय एमपीथ्री रेकॉर्डर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts :3 comments »

 • Sumeet said:  

  Wow Amit, thanks so much. Mi kiti divsanpasun asa application shodhat hoto.. All the ones I found were paid ones.. I know ffmpeg and mplayer on linux allow you to do the same, but hadn't found a single one on windows. Thanks! :)

 • Sumeet said:  

  Also, is there a software for video recording? That would be great..

 • prasad said:  

  this software is really very intresting one but I want a software
  WHICH CAN DOWNLOAD VIDEOS FROM YOUTUBE please send information on my email