गो ग्रीनः यूज अॉनलाईन व्हाईटबोर्ड

October 6, 2008 Leave a Comment

बोर्डरूम मिटिंग्ज म्हणजे काही वेळा अत्यंत सिरीयस तर काही वेळेला मजेशीर अशा असतात. कंपनीच्या स्वभावानुसार बोर्डरूम मिटिंग्जचे स्वरूप बदलते. आयटी कंपन्यांतील मिटिंग रूम्स आणि एखाद्या केमिकल फॅक्टरीतील मिटिंग रूम यांच्यात प्रचंड मोठे अंतर असते. पण मिटिंग रूम म्हटलं की दोन गोष्टी कॉमन असतात. एक म्हणजे प्रोजेक्टर आणि दुसरी म्हणजे व्हाईटबोर्ड. मिटिंगरूमसाठी मस्ट असणाऱ्या या दोन गोष्टी. पण ज्या कंपन्या आकाराने लहान असतात किंवा एखाद्या खोलीतून किंवा फ्लॅटमधून चालवल्या जातात त्यांना एवढी चैन परवडणारी नसते. अशा लोकांसाठी आज मी काही अॉनलाईन व्हाईटबोडर्ड्स संदभर्भात माहिती देणार आहे.
अॉनलाईन व्हाईटबोर्ड म्हटलं की प्लेन व्हाईटबोर्ड असं नाही. व्हाईटबोर्डची बेसिक फीचर्स या साईट्समध्ये आहेतच; परंतु अॉनलाईन कोलॅबरेशन टूल्स म्हणून या सेवांचे महत्त्व अधिक आहे. कल्पना करा की तुम्ही मिटिंगमध्ये प्रेझेंटेशन देत आहात. तुमच्या बॉसने त्यातील एका मुद्द्यावर काही शंका उपस्थिक केल्या आहेत. आता त्याचे स्पष्टीकरण देताना तुम्हाला व्हाईटबोर्डचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आधी प्रेझेंटेशन क्लोज करणार. त्यानंतर लाईट्स अॉन करणार. मग व्हाईटबोर्डकडे जाणार. मार्कर्स शोधणार आणि मग स्पष्टीकरणे देण्यास सुरवात करणार. त्यानंतर पुन्हा लाईट्स अॉफ करून जागेवर येणार व प्रेझेंटेशन पुढे सुरू करणार. या सगळ्या स्टेप्स एका प्रेझेंटेशनदरम्यान चार-पाच वेळा कराव्या लागल्या तर?



हे टाळण्यासाठी तुम्ही अॉनलाईन व्हाईटबोडर्ड्स आणि कोलॅबरेशन टूल्सचा वापर करू शकता. या सेवा अॉनलाईन असल्याने तुम्ही संबंधित साईटवर जाऊन थेट व्हाईटबोर्डचा वापर करू शकता. व्हाईटबोर्ड वापरण्यासाठी आवश्यक ती सर्व टूल्स (पेन, ब्रश, इरेझर, शेप्स, टेक्स्ट इ.) उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्हाला काहीही ड्रॉ करता येते. थोडक्यात सर्वसाधारण व्हाईटबोर्डसारखा या व्हाईटबोर्डचा वापर करता येतो आणि त्यासाठी सतत उठबसही करावी लागत नाही. तुम्ही प्रेझेंटेशन स्विच करून अॉनलाईन व्हाईटबोर्ड प्रोजेक्ट करू शकता. याचा आणखी एक फायदा म्हणजे या तुम्ही तुमचा व्हाईटबोर्ड इतरांशी शेअर करून अॉनलाईन मिटींग घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर तुम्ही इतर ठिकाणी बसलेल्या तुमच्या सहकाऱ्यांना अॅड करून व्हॉईस कॉन्फरन्सही करू शकता. त्याचवेळी व्हाईटबोर्डचा वापर करणेही शक्य होते आणि फाईल्सही ट्रान्स्फर करता येतात.
खालीलपैकी कोणतीही सेवा तुम्ही ट्राय करून पाहू शकताः

डॅबलबोर्ड

ट्विडला
बुक्गू
स्क्रिबलिंक
स्टिक्सी

यातील बहुतांश सेवांची प्रीमियम व्हर्जन्स पेड स्वरूपात उपलब्ध आहेत.
साधी-सोपी टेक्नॉलॉजी सजेस्ट्सः ट्विडला

Related Posts :



1 comments »

  • veerendra said:  

    wa farach mast ani usefull tech ahe hi .. really it will save lots of ink and relatively reduce the polution to0 !