, ,

अनोळखी मोबाईल नंबर कसा लोकेट कराल?

October 7, 2008 Leave a Comment

सकाळी-सकाळी कुठूनतरी कॉल आल्याने शैलेशची झोपमोड झाली. पुन्हा झोप लागते न लागते तो पुन्हा एकदा कॉल. उचलेपर्यंत कट झाल्याने शैलेशने त्या अनोळखी मोबाईल नंबरवर कॉल केला. समोरील व्यक्तीने रिस्पॉन्स न दिल्याने त्याला काही कळेना. अशा सिच्युएशनमध्ये आपण बऱ्याचवेळा सापडतो. अनोळखी नंबर. कोण असेल? कुठून फोन केला असेल? कशासाठी फोन केला असेल? आपला फोन का उचलला नसेल? अशा अनेक शंका उपस्थित होतात. तो नंबर कुठला आहे, हे कळाले तरी आपण किमान एका दिशेने विचार करू शकतो. पण तसा कोणताच क्लू न मिळाल्याने अस्वस्थता आणखीच वाढत जाते. शैलेशकडे मात्र त्यावर एक उपाय होता.

मोबाईल नंबर लोकेटर हे छोटेसे अॅप्लीकेशन मोबाईलवर डाऊनलोड करून भारतातील कोणताही मोबाईल नंबरचा ट्रेस तुम्ही लावू शकता. उदा. तुम्हाला ९००४५xxxxx या नंबरवरून फोन आला आणि कट झाला किंवा त्यावरून एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देते आहे. सदर नंबर कोणत्या कंपनीचा आणि कोणत्या महानगरातील किंवा राज्यातील आहे, हे तुम्हाला मोबाईल नंबर लोकेटरच्या आधारे शोधून काढता येईल. तुमचा फोन जावा टेक्नॉलॉजीला सपोर्ट करत असेल तर याचे अॅप्लीकेशन तुम्ही येथून डाऊनलोड करू शकता. अन्यथा www.internet4mobile.com या साईटवरूनही तुम्ही नंबर लोकेट करू शकता. आलेल्या नंबरमधील पहिले चार डिजिट्स एंटर करताच तुम्हाला पुढील माहिती मिळेल:
Mobile Code : 9004
State : Maharashtra
City : Mumbai
Service Provider : Airtel [ GSM ]सदर नंबर कुणाचा आहे, हे शोधून काढण्यासाठी मात्र संबंधित मोबाईल कंपनीचाच आधार घ्यावा लागेल. ज्यांचे मोबाईल हॅंडसेट्स कम्पॅटिबल नसतील ते लोक थेट साईटवरून मोबाईल नंबर लोकेट करू शकतात. याचप्रमाणे लॅंडलाईनवरून आलेला अनोळखी नंबर शोधून काढण्यासाठी याच साईटवर एसटीडी कोड फाईंडरही उपलब्ध आहे.

Related Posts :2 comments »

  • Veerendra said:  

    great .. this is really informative post .. i will share link to ur post !

  • TraceMobile said:  

    very useful and informative post...thanks a lot...