प्रोफेशनल ‘अॉनलाईन’ फोटो-एडिटर...

October 9, 2008 Leave a Comment

मध्यंतरी माझा एक मित्र मला सांगत होता की त्याने गेल्या दीड-दोन महिन्यांत मायक्रोसॉफ्ट अॉफिसपेक्षा गुगल डॉक्सचाच अधिक वापर केला आहे. डेस्कटॉप अॅप्लीकेशन्सपेक्षा वेब अॅप्लीकेशन्स अधिक लवचिक असतात. त्यात शेअरिंगसारख्या सुविधा मिळतात. त्यामुळे आजकाल अनेक जण विविध वेब अॅप्लीकेशन्स वापरताना आढळून येतात. मागे मी मोबाईल वॉलपेपर आणि प्रोफाईल पिक्चर तयार करण्यासाठी दोन वेब अॅप्लीकेशन्सची माहिती दिली होती. त्याचा वापर केल्यानंतर तुम्हालाही वेब अॅप्लीकेशन्सचे महत्त्व पटले असेल. आज मी अॉनलाईन फोटो एडिटिंगच्या काही वेब अॅप्लीकेशन्सची माहिती देणार आहे.

अनेकवेळा आपल्याला फोटो एडिट करण्याची गरज भासते. पण आपण प्रोफेशनल फोटोग्राफर किंवा ग्राफिक डिझायनर नसल्यामुळे त्याच्याशी संबंधित सॉफ्टवेअर (उदा. फोटोशॉप) आपल्याकडे नसते. असले तरी त्याचा योग्य वापर कसा करायचा याची माहिती नसते. अशावेळी आपण अॉनलाईन फोटो एडिटिंग अॅप्लीकेशन्स वापरू शकतो. विशेष म्हणजे पुढे दिलेली सर्व अॅप्लीकेशन्स मोफत वापरता येतात.

पिक्सलरः
फोटोशॉपसारखाच युजर इंटरफेस असणारे हे फ्लॅश वेब अॅप्लीकेशन आहे. बहुतांश टूल्स फोटोशॉपमधील टूल्सप्रमाणेच आहेत. त्यामुळे फोटोशॉपची बेसिक माहिती असल्यास वापरण्यात अत्यंत सोपे.


स्प्लॅशअपः हे देखील फ्लॅश वेब अॅप्लीकेशन आहे. यातून तुम्ही फेसबुक, फ्लिकर, पिकासा, किंवा तुमच्या वैयक्तिक वेबसाईटवरील इमेजेस थेट एडिट करू शकता. याचा इंटरफेसही फोटोशॉपशी मिळता-जुळता आहे.


फिनिक्सः अॅव्हिअॅरी कंपनीने लॉंच केलेल्या या वेब-बेस्ड इमेज एडिटरमध्ये इतरांपेक्षा अधिक फीचर्स आहेत. अॅव्हिअरीचीच पिकॉक, रॅव्हन आणि टोकन ही तीन इतर अॅप्लीकेशन्स वापरून अगदी प्रोफेशनल क्वालिटी इमेज एडिटिंग करणे शक्य होते.


पिक्सरः
क्रॉप, रिसाईझ, फ्लिप, रोटेट आणि इफेक्ट्स एवढी मोजकी फीचर्स हवी असतील तर तुम्ही पिक्सर वापरू शकता. इमेज क्रॉपिंग आणि रिसायजिंगसाठी हे अॅप्लीकेशन सर्वोत्तम आहे.

72फोटोजः अॉनलाईन एडिट करून अॉनलाईन स्टोअर करण्यासाठी ही उत्तम सेवा आहे.

आणखी काही फोटो एडिटिंग वेब अॅप्लीकेशन्सः
फोटो फ्लेक्सर
सुमोपेंट
पिकमॅजिक
पिकनिक

Thanks Jacob

Related Posts :0 comments »