,

न्यू, एम्प्रूव्ह्ड १२३ ग्रीटिंग्ज!

October 14, 2008 Leave a Comment

तुम्ही पोस्टाने पाठवलेलं शेवटचं दिवाळी ग्रीटिंग आठवतंय? साधारण तीन वषर्षांपूवर्वी मी पोस्टाने शेवटचं दिवाळी ग्रीटिंग पाठवलं होतं. त्यानंतर दसरा, दिवाळी, वाढदिवस, अॅनिव्हर्सरी आदी प्रसंगी ग्रीटिंग पाठवतो, पण अॉनलाईन! अॉनलाईन ग्रीटिंग पाठवण्यासाठी शेकडो सेवा उपलब्ध आहेत, पण सवर्वांना माहित असलेली आणि सवर्वाधिक वापरली जाणारी सेवा म्हणजे १२३ग्रीटिंग्ज डॉट कॉम. या साईटने यंदा कात टाकली आहे.वेब २.० तंत्रज्ञानाचा वापर करून रिडिझाईन केलेल्या १२३ग्रीटिंग्ज डॉट कॉमने इरिटेटिंग पॉप-अप आणि पॉप-अंडर अॅड्सना रामराम ठोकला आहे. या माध्यमातून उत्पन्न मिळत असले तरी पॉप-अप आणि पॉप-अंडर अॅड्समुळे तुमच्याकडे येणाऱ्या युजर दुरावण्याची शक्यता असते. १२३ग्रीटिंग्ज डॉट कॉमचा वापर करून सुमारे १२ कोटी लोक एकमेकांना ग्रीटिंग्ज पाठवत असतात. या सवर्वांना अधिक चांगला एक्स्पीरिअंस देण्यासाठी कंपनीने अनेक नवी फीचर्स अॅड केली आहेत.

सुटसुटीत मांडणी, विविध प्रसंगांसाठी उपलब्ध असलेल्या ग्रीटिंग्जचे व्यवस्थित वगर्गीकरण, प्रत्येक ग्रीटिंग कार्डवर मत मांडण्याची सुविधा, रेटिंग्ज, ब्लॉग किंवा साईटमध्ये एम्बेड करण्याची सोय, पर्सनलाईज्ड काडर्ड्स, कूल टूल्स आदी विविध फीचर्समुळे ही साईट अधिक आकर्षक झाली आहे. कमीत-कमी स्टेप्समध्ये ग्रीटिंग कसे पाठवता येईल, यावर कंपनीने भर दिला अाहे.

साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा!


Send this eCard !Also Read: Nokia's Diwali Dhamaka!

Related Posts :