, ,

राज ठाकरेंचे काय होणार?

October 21, 2008 Leave a Comment

आजचा सबंध दिवस महाराष्ट्रातील लोक राज ठाकरेंकडे लक्ष ठेवून होते. पहाटे अडीच वाजता राज ठाकरेंना रत्नागिरीत अटक झाल्यानंतर दुपारी वांद्र्याच्या कोटर्टात आणले. त्यांच्यावर दाखल करण्यात अालेल्या विविध गुन्ह्यांत एका कोटर्टाने त्यांना जामीन दिला, तर एका कोटर्टाने नाकारला. त्यामुळे अगोदरच धास्तावलेले सर्वसामान्य लोक दिवसभर न्यूज चॅनेल्स आणि वेबसाईट्सवर नजर ठेवून होते. साधी-सोपी टेक्नॉलॉजीवर अचानक राज ठाकरे कसे अवतरले? हा ब्लॉग कोणी हॅक तर नाही ना केला?

नाही. साधी-सोपी टेक्नॉलॉजी सुरक्षित आहे. केवळ एका नव्या अॉनलाईन सेवेची माहिती करून देण्यासाठी साधी-सोपी टेक्नॉलॉजीवर राज ठाकरेंच्या अटकेचे उदाहरण घेतले आहे. काही प्रसंगी आपण वेबसाईट्सला अगदी चिकटून बसतो. १०-१० सेकंदांनी वेबसाईट रिफ्रेश करतो. कारण सतत काही ना काही अपडेट मिळत असतात. पण सतत रिफ्रेश करणं म्हणजे...काही वेळाने कंटाळा यायला लागतो आणि नेमक्या तेवढ्याच वेळात काहीतरी महत्त्वाची घटना घडते. क्रिकेट स्कोअर देणाऱ्या साईट्समध्ये अॉटो रिफ्रेशची सोय असते. बऱ्याच ब्राऊजरमध्येही अॉटो-रिफ्रेशची सोय असते. नसल्यास तसे प्लग-इन्स किंवा अॅड-अॉन्स असतात. उदा. फायरफॉक्ससाठी रिलोड एव्हरी हे अॅड-अॉन उपलब्ध आहे. पण अशी अॅड-अॉन्स वापरल्यामुळे ब्राऊजरमधील सर्व साईट्स सतत रिफ्रेश होत राहतात. याची आपल्याला गरज नसते. केवळ न्यूज साईट्स किंवा सतत अपडेट होणाऱ्या साईट्स रिफ्रेश व्हाव्यात, ही आपली गरज असते. त्यावेळी तुम्ही साईट रिलोडर ही अॉनलाईन सेवा वापरू शकता.




साईट रिलोडरमध्ये तुम्हाला हव्या त्या साईट्सची यादी तुम्ही तयार करून ठेवू शकता. साईट रिलोडरवर साईन इन होण्यासाठी तुम्ही गुगलचे अकाऊंट वापरू शकता. साईन इन झाल्यानंतर तुम्ही हव्या त्या साईटची यादी तयार करून सेव्ह करू शकता. साईट रिलोडर वापरण्यापूवर्वी पॉप-अप ब्लॉकर डिअॅक्टिव्हेट करावे लागेल किंवा अॉल्वेज अलो पॉप-अप्स फ्रॉम साईट रिलोडर असा अॉप्शन वापरावा लागेल. एखादी साईट किती वेळाने रिफ्रेश व्हावी, यासाठी तुम्ही पाच सेकंदांपासून ३० मिनिटांपर्यंतचा पयर्याय निवडू शकता.

Related Posts :



0 comments »