,

कॉम्प्रेस अॉल लिंक्स

October 22, 2008 Leave a Comment

टायनी यूआरएलसारख्या यूआरएल शॉर्टनिंग सेवा तुम्ही नक्कीच वापरत असाल. अशा सेवांच्या उपयुक्ततेबद्दल नव्याने सांगण्यासारखे काही नाही. समोरच्या व्यक्तीस चटकन लक्षात राहील, यासाठी एखादी भली मोठी यूआरएल (लिंक) लहान करण्यासाठी या सेवा वापरल्या जातात. यात चालणाऱ्या स्पधर्धेबद्दल मी या अगोदर माहिती (वाचाः शॉर्ट अॅंड स्वीट) दिलेली आहे. आज मी याच पठडीतल्या आणखी एका भन्नाट सेवेची माहिती देणार आहे.

काही वेळा आपल्याला एका विषयासंबंधीच्या अनेक लिंक्स शेअर करावयाच्या असतात. अशा वेळी जवळपास सर्वच लिंक्स हातभर मोठ्या असतात. त्यातील प्रत्येक लिंक टायनी यूआरएल किंवा तत्सम सेवा वापरून छोट्या करत बसण्यात काही अर्थ नसतो. कारण त्याने कन्फ्युजन (सर्व लिंक्स सारख्याच दिसतात) वाढण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी झिप फाईलसारख्या एकाच लिंकमध्ये सगळ्या लिंक्स कॉम्प्रेस करून देता आल्या तर? येस्स...असे करणे शक्य आहे. श्रिंक टू वन (shrink2one.com) या सेवेचा वापर करून तुम्ही अनेक लिंक्स एका लिंकमध्ये कॉम्प्रेस करू शकता.
उदा. तुम्हाला टेक्नॉलॉजीसंदर्भातील टॉप ५ साईट्सच्या लिंक्स एखाद्या व्यक्तीसोबत शेअर करावयाच्या अाहेत. या पाचही साईट्सच्या लिंक्स देण्याएेवजी तुम्ही केवळ खालील लिंक शेअर कराः
http://Shrink2One.com/943
या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संबंधित पाचही साईटच्या लिंक्स मिळतील. एवढेच नव्हे तर, त्या साईट्सचे थंबनेल्सही पाहावयास मिळतील. या पद्धतीने कॉम्प्रेस केलेल्या लिंक्स तुम्ही इन्स्टन्ट मेसेंजर्स किंवा एसएमएसवरही शेअर करू शकता.

Related Posts :0 comments »