,

टीव्ही गाईड २.०ः बर्प टीव्ही

November 19, 2008 Leave a Comment

झिप-ए-झॅप या इंडियन टीव्ही प्रोग्रामिंग गाईडची ओळख तुम्हाला गेल्या एका पोस्टमध्ये करून दिली होती. तुमच्यापैकी अनेक जण ही सेवा वापरत असतीलही. या सेवेमार्फत रेकमंडेड प्रोग्राम्सचे ई-मेल अलर्ट् नियमित येतात. एसएमएस अलर्ट मिळण्यास अडचणी येतात, असे माझ्या लक्षात आले. त्यामुळे अशीच एखादी दुसरी सेवा आहे किंवा कसे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि झिप-ए-झॅपपेक्षाही उत्तम सेवा सापडली.

बर्प या साईटबद्दल तुम्ही कधी एेकले आहे? एेकले नसल्यास सांगतो. आयआयटी कानपूरमधील एका विद्यार्थ्याने २००६ मध्ये बर्प डॉट कॉम ही साईट सुरू केली. सुरवातीला या सेवेचे उद्दिष्ट सिटी गाईड्स एवढ्यापुरतेच मयर्यादित होते. पुरेसे आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे बर्पच्या संस्थापकाने सिटी गाईड, सिटी सर्च, रिव्ह्य्ज, लाईफस्टाईल याविषयीच्या विविध अॉनलाईन सेवा सुरू केल्या. बर्प टीव्ही ही त्यापैकीच एक सेवा. बर्प टीव्ही म्हणजे भारतात दिसणाऱ्या ढीगभर चॅनेल्सचे अॉनलाईन प्रोग्राम गाईड! झिप-ए-झॅपपेक्षा बर्प टीव्ही अधिक प्रोफेशनल वाटतो. याचा इंटरफेसही वेब २.० साईटला साजेसा असा आहे. चॅनेल्सच्या कॅटेगरीज, प्रोग्राम जॉनर, मूव्हीज अॉन टीव्ही अशा सेक्शन्समुळे ही साईट अधिक उपयुक्त ठरते. शिवाय मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला कार्यक्रमांचे एसएमएस अलर्टही मिळतात.

प्रोग्राम लिस्टिंग


मूव्हीज अॉन टीव्ही


एसएमएस अलर्ट


फेव्हरेट चॅनेल्स, फेव्हरेट प्रोग्राम्स अशा लिस्टिंगही तुम्ही करून ठेवू शकता. फेव्हरेट प्रोग्राम्सचे एसएमएस अलर्ट तुम्हाला नियमित मिळतील. प्रोग्राम लिस्टिंग तुम्हाला ई-मेलवर देखील मिळू शकते. एवढेच नव्हे तर तुम्ही मोबाईलवरूनदेखील बर्प टीव्ही सर्फ करू शकता. त्यासाठी http://tv.burrp.com/m/ अशी लिंक तुमच्या मोबाईल ब्राऊजरमध्ये टाईप करून सर्फ करा व तुमचा अनुभव कळवा.

Related Posts :



0 comments »