“Ya firdaus barruhe jaminast,
aminasto aminasto aminast!"
"If there be a paradise on earth, It is here, it is here, it is here!"
मुघल बादशहा जहांगीरने काश्मीरचे केलेले हे वर्णन आजही लागू होते. काश्मीरबाबत वषर्षानुवषर्षे सुरू असलेले वाद बाजूला ठेवले तर या ओळींचे महत्त्व पटते. असो. माझ्या एका अत्यंत जवळच्या मित्राने काश्मीरहून केलेला हा एसएमएस वाचून तेथील स्वर्गवत वातावरण अक्षरशः समोर उभे राहिले. म्हटलं, तो आल्यावर तेथील फोटो तरी पाहू. पण कशाचं काय? तो आला आणि मेमरी कार्डमधून फोटो डाऊनलोड करताना चुकून मेमरी कार्ड फॉरमॅट झालं. आता स्वतःवर चिडचिड करण्यात काहीच हशील नव्हते. गुगलवर सर्च दिला - “recover photos from memory card” आणि ढिगाने सोल्यूशन्स सापडली. मेमरी कार्ड किंवा कोणत्याही एक्स्टर्नल मेमरी डिव्हाईसवरून चुकून डिलीट झालेला डेटा रिकव्हर करण्यासाठीच्या एका उत्तम सोल्यूशनची माहिती मी आज देणार आहे.
पीसी इन्स्पेक्टर स्मार्ट रिकव्हरी हे त्या सोल्यूशनचे नाव. पीसी इन्स्पेक्टर स्मार्ट रिकव्हरी हे केवळ सहा एमबीचे सॉफ्टवेअर डिलीट झालेल्या फाईल्स रिकव्हर करू शकते. या कॅटेगरीत येणारी अनेक सोल्यूशन्स पेड आहेत. पीसी इन्स्पेक्टर मात्र १०० टक्के मोफत आहे. मेमरी कार्ड किंवा इतर डिव्हाईसवरील डेटा डिलीट झाला असल्यास तो रिकव्हर करण्याचे चान्सेस वाढविण्यासाठी कृपया त्यावर इतर डेटा स्टोअर करू नका. सर्वप्रथम पीसी इन्स्पेक्टर डाऊनलोड करा. पीसी इन्स्पेक्टर विंडोज ९८ पासून एक्सपीपर्यंतच्या सर्व व्हर्जन्सवर रन होते. आता कार्ड रीडर किंवा डेटा केबलच्या साह्याने मेमरी कार्ड किंवा डिजिटल कॅमेरा कॉम्प्युटरला जोडा व पुढील स्टेप्स फॉलो कराः
-पीसी इन्स्पेक्टर रन करा
-ज्या ड्राईव्हमध्ये मेमरी कार्ड किंवा इतर मेमरी डिव्हाईस आहे तो ड्राईव्ह सिलेक्ट करा.
-ज्या फोल्डरमध्ये रिकव्हर झालेल्या फाईल्स ठेवायच्या आहेत, ते लोकेशन स्पेसिफाय करा.
-स्टार्टवर क्लिक करा.
-तुमच्याकडून डिलीट झालेल्या फाईल्स काही क्षणांतच रिकव्हर होतील
पीसी इन्स्पेक्टरचा वापर करून तुम्ही खालील फॉरमॅटमधील फाईल्स रिकव्हर करू शकताः
ARJ, AVI, BMP, CDR, DOC, DXF, DBF, XLS, EXE, GIF, HLP, HTML, HTM, JPG, LZH, MID, MOV, MP3, PDF, PNG, RTF, TAR, TIF, WAV, ZIP
Read the full story
Hot Launches!