,

थ्री-डायमेंशनल ब्राऊजिंग

July 3, 2008 Leave a Commentआतापर्यंत आपल्याला केवळ टू-डायमेंशनल सर्फिंगची सवय होती. पण आता थ्री-डायमेंशनल सर्फिंगचीही सवय करून घ्यायला हवी. कारण वेबदुनियेत ज्या गतीने बदल होताहेत त्यावरून असं वाटतंय की एकेकाळी स्वप्नवत वाटणाऱ्या या गोष्टी आता रोजच्या होणार आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये लॉंच झालेल्या स्पेसटाईम या थ्री-डायमेंशनल ब्राऊजरकडे पाहून तरी किमान असंच वाटतंय.


नेहमीच्या टू-डायमेंशनल ब्राऊजिंगमध्ये यूजर एक्स्पीरियंसला फारसे महत्त्व दिलेले नाही. त्यात युजेबिलिटीचा अधिक विचार केलेला आढळतो. त्यामुळे सर्च इंजिनच्या स्पधर्धेत उतरणाऱ्या नव्या प्लेअर्सनी यूजर एक्स्पीरियंसला अधिक महत्त्व देण्याचे ठरविलेले दिसते. गेल्या महिन्यात लॉंच झालेल्या व्ह्यूझी या सर्च इंजिनकडे पाहिल्यास हेच जाणवते. व्ह्यूझी बद्दल अधिक माहितीसाठी वाचाः सर्च विथ एक्स्पीरियंस. गेल्या वषर्षाच्या अखेरीस लोकांसमोर अालेल्या स्पेसटाईम या ब्राऊजरने यूजर एक्स्पीरियंसला महत्त्व दिल्याचे सर्वप्रथम जाणवले. स्पेसटाईम हा ब्राऊजर या गटात मोडत नसल्याची टीका यावर झाली. तथापि, नेहमीच्या टॅब्ड ब्राऊजिंगपेक्षा चांगला एक्स्पीरियंस हवा असेल तर स्पेसटाईम ट्राय करायलाच हवं. यातील प्री-डिफाईन्ड सर्च अॉप्शन्स एकदा वापरले की तुम्हाला टू-डायमेंशनल सर्चकडे परत यावेसेच वाटणार नाही. यू-ट्यूबवरील व्हिडीओ यू-ट्यूबवर पाहण्यापेक्षा स्पेसटाईमवर पाहणे अधिक सुखद वाटते. याचप्रमाणे अॅमेझॉन, ई-बे, गुगल इमेज, याहू इमेज आदी सर्च आणि आरएसएस फीड स्पेसटाईमच्या थ्री-डायमेंशनल वातावरणात अधिक अपील होतात.

स्पेसटाईम सध्या फक्त विंडोजसाठी उपलब्ध आहे. स्पेसटाईम इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही त्याचा वापर करून ब्राऊजिंग करण्यास सुरवात करू शकता. यावर इमेज सर्च करणे हा एक सुखद अनुभव आहे.
स्पेसटाईम डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts :0 comments »