,

रविवारची साफसफाई

August 3, 2008 Leave a Comment

रविवार म्हणजे साफसफाईचा दिवस. घरातल्या साफसफाईसोबत आपण आपल्या गॅजेट्सची, कॉम्प्युटरची, मेलबॉक्सेसची आणि सोशल नेटवर्किंगवरील आपल्या प्रोफाईल्सचीही साफसफाई करणे आवश्यक आहे. यासाठी मी अगोदरच्या काही पोस्ट्समध्ये माहिती दिली होती. ज्यांचे फेसबुकवर अकाऊंट आहे आणि ज्यांचा मित्रपरिवार दांडगा आहे, त्यांना दररोज ढिगाने अॅप्लीकेशन रिक्वेस्ट्स येत असणार. प्रत्येक रिक्वेस्ट पाहून ती अॅक्सेप्ट किंवा रिजेक्ट करायची म्हणजे वेळही तितकाच लागणार. पण आता तुम्ही एक क्लिकवर सगळ्या रिक्वेस्ट्स (फ्रेंड, इव्हेंट आणि ग्रुप इन्व्हाईट्स वगळून) इग्नोअर करू शकता.

अनेक सदस्यांच्या तक्रारींची दखल घेऊन फेसबुकने जानेवारीत Ignore All हे फीचर अॅड केले. एका ब्लॉगरने दिलेल्या माहितीनुसार २५ किंवा त्याहून अधिक रिक्वेस्ट्स अाल्यानंतरच हे फीचर अॅक्टीव्ह होते. पंचवीसहून कमी रिक्वेस्ट्स असणाऱ्यांनी Ignore All हे बुकमार्कलेट वापरावे. हे वापरणे अतिशय सोपे आहे. Ignore All वर राईट क्लिक करून ते तुमच्या बुकमार्क फेव्हरेट्समध्ये अॅड करा. फेसबुक रिफ्रेश केल्यानंतर रिक्वेस्टच्या शेजारी Ignore All अशी लिंक दिसू लागेल.कॉम्प्युटरची सफाई करण्यासाठी वाचाः मस्ट हॅव (सीसीक्लीनर)
डुप्लीकेट फाईल्स डिलीट करण्यासाठी वाचाः हार्डडिस्कला घेऊ द्या मोकळा श्वास!
मेल बॉक्समध्ये स्पॅम नको असल्यास वाचाः स्टे अवे फ्रॉम स्पॅम

Related Posts :0 comments »