,

विकिपेडियाः वाचा आणि एेकासुद्धा!

June 4, 2008 0 comments

आजकाल कुठलीही गोष्ट शोधायची असेल तर लोकं गुगल किंवा विकिपेडिया या दोन साईट्सचाच आधार घेतात. इथे नाही; तर कुठेच नाही, असे म्हणण्याची आता वेळ आली आहे. विकिपेडियावरील आर्टिकल्स आपण वाचतो. पण हीच आर्टिकल्स एेकायची म्हटली तर?

विकिपेडियाच्याच स्पोकन विकिपेडिया या प्रोजेक्टमध्ये दिलेले योगदान म्हणजे पेडियाफोन. जर्मनीतील हॅगन विद्यापीठाच्या कंट्रोल इंजीनिअरिंग ग्रुपतर्फे ही सेवा दिली जाते. अॅंड्रेस बिशॉफ यांचा त्यात मोलाचा वाटा आहे. पेडियाफोन सध्या बिटा फेजमध्ये आहे. यात तुम्ही सर्चसाठीचा कीवर्ड एंटर केला आणि 'Generate MP3/Podcast from Wikipedia article' यावर क्लिक केलं की पेडियाफोनद्वारे विकिपेडियावर त्या कीवर्डसाठी सर्च सुरू होतो आणि आलेला रिझल्ट एमपीथ्रीमध्ये कन्व्हर्ट केला जातो.

तुम्ही ही एमपीथ्री फाईल डाऊनलोड करून घेऊ शकता किंवा ती ब्राऊजरमध्येच एेकू शकता. तुम्ही आय-ट्यून्स वापरत असल्यास एक्सएमएल फाईल थेट आय-ट्यून्समध्ये एेकू शकता. पेडियाफोन इंग्लिश, जर्मन, फ्रेंच आणि स्पॅनिश भाषांत उपलब्ध आहे.



पेडियाफोनद्वारे आपण विकिपेडियावरील माहिती फोनवरूनसुद्धा घेऊ शकतो. त्यासाठी येथे दिलेल्या नंबरवर फोन करायचा आणि व्हॉईस प्रॉम्प्ट फॉलो करायच्या. (ही सेवा भारतात उपलब्ध नाही)
मोबाईलवर पेडियाफोन सर्व्हिस मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

से नो टू बुकिंग चार्ज!

इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने (आयएटीए) गेल्या शनिवारी शेवटचे पेपर एअर तिकीट इश्यू केलं. (अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा). अॉनलाईनच्या या युगात पेपर तिकीट बाळगणं सोयीचही नाही आणि ते इश्यू करणं विमान कंपन्यांना परवडणारंही नाही त्यामुळे २४० सभासदांच्या या असोसिएशनने हा निर्णय घेतला. नेहमी विमानप्रवास करणाऱ्यांना जाणवलं असेल की गेल्या एक-दोन वर्षांत विमानाची तिकीटं मिळणं किती सोपं झालंय ते. ट्रॅव्हल एजंटला फोन केला की दुसऱ्या मिनिटाला ई-तिकीट हजर. काही लोक तर ट्रॅव्हल एजंटकडे सुद्धा जात नाहीत. मेकमायट्रिप, क्लियरट्रिप, यात्रा या साईट्सवरून बुकिंग करतात. पण या साईट्सवरून बुकिंग केल्यास काही सर्व्हिस चार्ज द्यावा लागतो. तो टाळायचा असेल तर?

तर आपण ज्या एअरलाईनने प्रवास करणार आहोत त्या एअरलाईनच्या अधिकृत साईटवर जाऊन बुकिंग करणे, हा एकमेव पर्याय आहे. मग मेकमायट्रिप, क्लियरट्रिप या साईट्सचा फायदा काय? या साईट्स आपल्याला आपण दिलेल्या रूटवरील सर्व फ्लाईट्सची एकत्रित यादी देतात. त्यातून आपण आपल्याला सोयीस्कर अशा वेळचे आणि परवडेल अशा दराचे फ्लाईट निवडतो आणि तेथूनच त्याचं बुकिंग करतो. मग आपल्याला अशी एखादी सर्व्हिस मिळाली की जी अशी एकत्रित माहितीही देईल आणि नंतर ज्या-त्या एअरलाईन्सच्या किंवा सप्लायरच्या साईटवर आपल्याला रिडायरेक्ट करेल?


आहे...अशीच एक साईट आहे - मोबिसिमो डॉट कॉम. मोबिसिमो ही साईट तुम्ही दिलेल्या क्वेरीसाठी सुमारे १५७ साईट्स सर्च करते. या १५७ साईट्समध्ये जगातील सर्व प्रमुख एअरलाईन्स, ट्रॅव्हल एजन्सीज आणि ट्रॅव्हल साईट्सही अाहेत. त्यामुळे एखाद्या रूटसाठी मेकमायट्रिप किंवा तत्सम साईट्सने काही अॉफर दिल्या असतील तर त्याही तुम्हाला पाहायला मिळतील. तेव्हा तुमच्या पुढील प्रवासासाठीच्या बुकिंगसाठी मोबिसिमो वापरून पाहा.

STEP 1:

मोबिसिमो डॉट कॉमवरील सर्च रिझल्ट असे दिसतात

STEP 2:

फ्लाईट सिलेक्ट केल्यावर मोबिसिमो आपल्याला किंगफिशरच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट करते.

STEP 3:

किंगफिशरवरील किंमत आणि मोबिसिमोवरील किंमत सारखी आहे (रू. ५३७५ आणि १२६.१० यूएस डॉलर)
Read the full story

,

गुगल मॅक सर्च

June 3, 2008 0 comments

ज्यांच्याकडे अॅपलचा लॅपटॉप (मॅकबुक) किंवा डेस्कटॉप (आय-मॅक) आहे त्यांना अनेक वेळा मॅकिन्तोश अॉपरेटिंग सिस्टिम किंवा अॅपलसंदर्भात सर्च करावा लागतो. अशा वेळी अनेकदा अनावश्यक सर्च रिझल्ट्स येतात. ते टाळण्यासाठी एक खास टिपः
तुम्ही मॅक वापरत असाल आणि गुगल फॅन असाल तर हा प्रॉब्लेम सुटला म्हणून समजा.





गुगलची मॅकसाठी स्वतंत्र सर्च फॅसिलिटी आहे. www.google.com/mac या लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला सर्चचे दोन अॉप्शन्स मिळतील - १. सर्च मॅक साईट्स आणि २. सर्च द वेब. पहिल्या अॉप्शनमध्ये तुम्ही दिलेल्या क्वेरीसाठी फक्त मॅकसंदर्भात असलेला डेटा चेक केला जाईल. त्यामुळे त्यातून मिळणारे रिझल्ट्स हे नक्कीच योग्य असणार आहेत. तेव्हा तुम्हाला मॅकबद्दल काही क्वेरी असेल तर गुगल मॅक सर्च एकदा आजमावून पाहा...
Read the full story

जाहिरातीचा ‘टेक’ फंडा!

कल्पना करा, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये आहात आणि तुमच्या मोबाईलचे ब्लुटूथ अॉन आहे. तुम्ही ली-कूपरच्या स्टोअरजवळ आहात आणि तुम्हाला ब्लुटूथ वरून एक मेसेज येतो. ‘Come within next 15 minutes to avail 25% discount on Lee-Cooper shoes at Shop # 22, Level 2’. नॉट अ बॅड आयडिया...ब्लुटूथ अॅडव्हर्टायझिंगने आता जोर धरलाय. तुम्ही जर बिझनेसमध्ये असाल तर ही नवी मार्केटिंग कन्सेप्ट ट्राय करायला हरकत नाही.



ब्लुमॅग्नेट सॉफ्टवेअर असे दिसते

तुमच्याकडे ब्लुटूथ एनेबल्ड डेस्कटॉप किंवा लॅपटॉप असेल तर त्यावर ब्लुमॅग्नेट, ब्लुसेन्डर किंवा ब्लुब्लिट्झ इन्स्टॉल करा. त्यात तुमच्या जाहिरातीचा मजकूर लिहा. ही जाहिरात किती वाजता पाठवायची त्याच्या वेळाही फिक्स करता येतात. आता तुमच्या भोवती किती ब्लुटूथ डिव्हायसेस अॉन आहेत, हे तुम्हाला दिसेल. त्यातील ज्यांना जाहिरात पाठवायची आहे त्यांचे डिव्हायसेस सिलेक्ट करा आणि पाठवून द्या.
ब्लुटूथ अॅडव्हर्टायझिंग सॉफ्टवेअर्स साधारण १०० ते १५० डॉलर्सना (अंदाजे चार ते सहा हजार रुपये) मिळतात. पण त्यातून ग्राहक ओढला जाणार असेल तर ही गुंतवणूक फार मोठी नाहीये...


ब्लुटूथ मार्केटिंग कुठे वापरता येऊ शकते?

एअरपोर्ट्
बॅंक्स
बस स्टॉप्स
अॉटो शोरूम्स
लाईव्ह शोज, कन्सर्ट्स
हॉस्पीटल्स
हॉटेल्स, रिसॉर्ट्स
शॉपिंग मॉल्स
मल्टिप्लेक्सेस, नाट्यगृह
पब्ज
सार्वजनिक ठिकाणे (बाजारपेठा, मंडई, बस स्टॅंड, रेल्वे स्टेशन इ.)
मैदाने
प्रदर्शने
कॉलेज किंवा अॉफिस कॅम्पस

ब्लुब्लिट्झची वैशिष्ट्ये (प्रेझेंटेशन डाऊनलोडकरण्यासाठी येथे क्लिक करा)
Read the full story

,

जी-मेल अनब्लॉक कसे करावे?

June 2, 2008 0 comments

साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या एका वाचकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरः

प्रश्नः
नमस्कार ,
मला तुमची sasotechnology ही blog site खुपच छान वाटली.तरी मला आपण मला माझ्या ओफ़ीस मधे gmail.com ही site block केलेली आहे,ती कशी unblock करावी ह्याची माहीती देणे.

धन्यवाद.
एक वाचक.


उत्तरः

१. gmail.com एेवजी वेगवेगळे यूआरएल वापरून पाहा. उदा.
http://www.gmail.com किंवा https://www.gmail.com
http://gmail.com किंवा https://gmail.com
http://m.gmail.com किंवा https://m.gmail.com
http://googlemail.com किंवा https://googlemail.com
http://mail.google.com/mail/x/ किंवा https://mail.google.com/mail/x


२. मायक्रोसॉफ्ट आऊटलूक किंवा तत्सम डेस्कटॉप मेल क्लाएंटशी जी-मेल configure करून पाहा. मदतीसाठी येथे क्लिक करा.
३. गुगल डेस्कटॉप क्लाएंट डाऊनलोड करून त्याद्रारे जी-मेल अॅक्सेस करा.

Thanks Eric
Read the full story

लेट्स चेक वन्स अगेन...

‘लेट्स नेव्हर गेट लॉस्ट अगेन...’ अशा टॅगलाईनने नोकिया ६११० या नेव्हिगेटर फोनची सध्या भारतात जोरदार जाहिरात सुरू आहे. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमने (जीपीएस) आता भारतात बाळसं धरायला सुरवात केलीये आणि नेहमीप्रमाणे मोबाईल हॅंडसेट्सने त्यात बाजी मारलीये. भारतातील लोक साधारण सहा महिन्याला आपला हॅंडसेट बदलतात, असा ट्रेंड आहे. त्यामुळे नवं काही आलं की त्यावर लगेच उड्या पडतात. तुम्ही भारतात असाल आणि आता नोकियाचा नेव्हिगेटर फोन घेण्याच्या विचारात असाल, तर थांबा.

कदाचित तुम्ही वापरत असलेल्या मोबाईलमध्येसुद्धा बिल्ट-इन जीपीएस आणि नेव्हिगेशन असू शकेल. अशा काही हॅंडसेट्सची यादी खाली देत आहेः



नोकिया

नोकिया 6110: भारतातील प्रमुख शहरांच्या मॅपसह (नवी दिल्ली, गुडगाव, फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा, मुंबई, ठाणे, वाशी, बंगलोर, हैदराबाद, चेन्नई, पुणे, अहमदाबाद आणि जयपूर)
* नोकिया e65
* नोकिया e62
* नोकिया 3250
* नोकिया e51
* नोकिया N72
* नोकिया n95
* नोकिया 3220
* नोकिया 6300
* नोकिया 6230i
* नोकिया E61i
* नोकिया E90 कम्युनिकेटर
* नोकिया 5200

सोनी एरिक्सन


* सोनी एरिक्सन K790i
* सोनी एरिक्सन p1i

एचटीसी

* एचटीसी p3350
* एचटीसी टच p34500
* एचटीसी टच क्रूझ
* एचटीसी P3300

असूस

* असूस p526
* असूस 527: तीस भारतीय शहरांच्या मॅपसह
* असूस 750: तीस भारतीय शहरांच्या मॅपसह

मोटोरोला


* मोटोरोला L7I
* मोटोरोला q9h

आयमेट


* आयमेट जॅक

ओ २ झिंक

Thanks GPSININDIA
Read the full story