कमर्शियल ट्विटर: यामर

September 12, 2008 1 comments



शिक्षक आणि विद्याथ्यर्थ्यांसाठी तयार केलेल्या एडमोडो या सेवेबद्दल मी कालच्या पोस्टमध्ये माहिती दिली होती. संबंधितांना त्याचा फायदा नक्कीच होईल. इनोवेटिव्ह टेक्नॉलॉजी कन्सेप्ट्सना आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी टेकक्रंच या साईटतरफे भरवल्या जाणाऱ्या टेकक्रंच ५० या परिषदेच्या आजच्या शेवटच्या दिवशी ५२ स्पर्धकांमध्ये यामर या नव्या सेवेस पहिले बक्षीस मिळाले. ट्विटर विथ बिझनेस मॉडेल - असे टेकक्रंचने यामरचे वर्णन केले आहे.



एडमोडोप्रमाणेच यामरदेखील अतिशय फोकस्ड सेवा आहे. यामर ही सेवा एखाद्या कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांसाठी तयार केली आहे. What are you doing? असे ट्विटर विचारत असेल तर What are you working on? असे यामर विचारतो. तुम्ही आता काय काम करत आहात याची ताजी माहिती त्याच प्रोजेक्टवर काम करणाऱ्या इतरांना तसेच तुमच्या कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना मिळण्यासाठी यामर उपयोगी ठरते. यामर तयार करणाऱ्यांनी इंटर्नल कम्युनिकेशनसाठी ही शक्कल लढवली होती. पण या कल्पनेत दम आहे हे ओळखून कंपनीच्या मालकाने यामर नावानेच नवी कंपनी काढली व टेकक्रंच ५० मध्ये यामरचे बीटा व्हर्जन लॉंच केले. यामरवर रजिस्टर होण्यासाठी तुमच्याकडे कंपनीचा ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे (उदा. yourname@yourcompany.com). रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही कंपनीतील इतर सहकाऱ्यांना इन्व्हाईट्स पाठवू शकता. तुमच्या नेटवर्कमधील सहकाऱ्यांचे मेसेजेस यामरच्या पेजवर तुम्ही पाहू शकाल. विशिष्ट सहकाऱ्यांना तुम्ही फॉलोही करू शकाल. तुम्हाला मेसेजेस पोस्ट करायचे असतील तर तुम्ही जी-टॉक, एम किंवा जॅबरवरूनही पोस्ट करू शकाल. अमेरिकेतील ठराविक मोबाईल कंपन्यांची सेवा वापरणाऱ्यांना एसएमएसवरूनही मेसेजेस पाठवता येऊ शकतात. यामरवरील मेसेजेस डिलीट करायचे असतील किंवा काही सदस्यांना काढून टाकायचे असेल तर तुम्हाला विशेष अॅडमिनिस्ट्रेटिव्ह राईट्स मिळवावे लागतात. यात यामरचे बिझनेस मॉडेल दडलेले आहे. यामरवरील एखाद्या कंपनीचे अकाऊंट क्लेम करायचे असतील तर त्या कंपनीस प्रत्येक सदस्यामागे दरमहा १ डॉलर इतका आकार भरावा लागतो. म्हणजे तुमच्या कंपनीत ५०० कर्मचारी असतील तर तुम्हाला दरमहा ५०० डॉलर खर्च येईल. विशेष राईट्स नको असतील तर ही सेवा विनामूल्य वापरता येते.
Read the full story

एज्युकेशनल ट्विटरः एडमोडो

September 11, 2008 0 comments



तुमच्यापैकी अनेक जण ट्विटर वापरत असतील. ट्विटर म्हणजे आता, या क्षणी तुम्ही काय करत आहात किंवा काय विचार करत आहात हे इतरांना सांगणे. वेब २.०च्या भाषेत याला मायक्रोब्लॉगिंग असे म्हणतात. मायक्रोब्लॉगिंगसाठी अनेक सेवा आहेत; पण ट्विटरसारखा प्रतिसाद इतर कोणत्याही सेवेस मिळाला नाही. जुलै २००८ अखेर सुमारे २२ लाख लोकांना ट्विटरवर आपले अकाऊंट क्रिएट केलेले आहे. ट्विटरवरून प्रेरणा घेऊन अमेरिकेतील जेफरी ओ’हारा याने शिक्षक आणि विद्याथ्यर्थ्यांना उपयोगास येईल असा मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म तयार केला आहे.



एडमोडो हे या प्लॅटफॉर्मचे नाव. याची तुलना ट्विटरशी होत असली तरी, यातील सोयी-सुविधा ट्विटरहून अधिक चांगल्या आहेत. ट्विटरचा वापर करून तुम्ही केवळ १४० कॅरेक्टर्समध्येच मेसेज पाठवू शकता. एडमोडोमध्ये मेसेज, नोट्ससह फाईलही शेअर करता येतात. एडमोडोवर तुम्ही शिक्षक किंवा विद्याथर्थी म्हणून रजिस्टर होऊ शकता. एडमोडोवर रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही एखादा नवा ग्रुप (उदा. क्लास अॉफ २००८ किंवा फायनान्स) तयार करू शकता. ग्रुप तयार केल्यानंतर त्या ग्रुपसाठी एक युनिक कोड तयार होतो (उदा. xyz123). हा कोड वापरून तुम्ही इतरांना हा ग्रुप जॉईन करण्यास सांगू शकता. एखाद्या व्यक्तीला किंवा ग्रुपला अलर्ट, नोट्स, लिंक्स, फाईल्स, असाईनमेंट्स, इव्हेंट्स, डायरेक्ट मेसेजेस आदी सर्व गोष्टी तुम्ही एडमोडोवरून पाठवू शकता. काही असाईनमेंट्स किंवा फाईल्स अधिक काळासाठी स्टोअर करून ठेवायच्या असतील तर तुम्ही लॉकर ही सेवा वापरून स्टोअर करू शकता. आजकाल विद्याथर्थी आणि शिक्षकदेखील अॉरकुट, फेसबुक, लिंक्डइन अादी सोशल नेटवर्किंग साईट्सवरून एकमेकांशी संपर्क ठेवून असतात. पण वेब २.०चा अभ्यास आणि नॉलेज शेअरिंगसाठी अधिकाधिक फायदा करून घ्यायचा असेल तर एडमोडो वापरून पाहायलाच हवे.
Read the full story

,

लाईटवेट मेल

September 10, 2008 0 comments

कधी कधी इंटरनेटची स्पीड इतकी कमी असते की गुगलसुद्धा ओपन होण्यात अडचण येते. अशा वेळी आपल्याला एखादा अर्जंट ई-मेल करायचा असेल तर?



जी-मेल ओपन होताना अडचण येत असेल तर तुम्ही बेसिक एचटीएमएल व्ह्यू अॉप्शन सिलेक्ट करू शकता. पण त्याहूनही लाईट अॉप्शन हवा असेल तर तुम्ही जी-मेल मोबाईल ट्राय करू शकता. जी-मेल मोबाईल हे सर्वांत लाईट अॅप्लीकेशन आहे. जी-मेल मोबाईल केवळ मोबाईलवरंच वापरावं असं नाही. तुम्ही कोणत्याही ब्राऊजरमध्ये जी-मेल मोबाईल ओपन करू शकता. त्यासाठी http://m.gmail.com यावर क्लिक करा. तुम्ही एक स्वतंत्र विंडोमध्ये जी-मेल मोबाईल ओपन करून ठेवू शकता. याच पद्धतीने तुम्ही याहू मेल (m.yahoo.com), एमएसएन मेल (mobile.msn.com) आदी सहजरित्या वापरू शकता. मोबाईलवर आणि पीसीवरदेखील!
Read the full story

,

टीव्ही गाईड हो तो झिप-ए-झॅप हो!

September 9, 2008 0 comments



टीव्ही हो तो बिग टीव्ही हो, अशी जाहिरात करत अनिल धीरूभाई अंबानीने डीटीएचच्या बाजारात प्रवेश केला आहे. सध्या डिश टीव्ही, टाटा स्काय, दूरदर्शन आणि सन टीव्ही या चार डीटीएच सेवा बाजारात आहेत. मोबाईलचा ज्या गतीने प्रसार झाला त्याच गतीने डीटीएचचा भारतात प्रसार होत आहे. त्यामुळे येत्या पाच-दहा वषर्षांत अाणखी काही डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्या येऊन येथील १०० टक्के बाजारपेठ काबीज करतील. सर्वसाधारण केबल सेवा आणि डीटीएच यातील प्रमुख फरक म्हणजे िडजीटल क्वालिटी आणि क्विक सव्हर्व्हीस. केबल अॉपरेटर्सकडून या दोन्ही गोष्टींची अपेक्षा ठेवणे म्हणजे...असो. डीटीएचचा आणखी एक फायदा म्हणजे प्रोग्राम गाईड. चॅनेल्सच्या भाऊगर्दीत आपल्याला आवडणारे चॅनेल आणि त्यावरील आवडत्या कार्यक्रमाची वेळ लक्षात ठेवणे कठीण जाते. चॅनेल स्वॅपिंगमध्येच इतका वेळ जातो की एखाद्या वेळेस एखादा चांगला कार्यक्रम मिस होण्याची शक्यता असते. अशावेळी आपल्या आवडत्या चॅनेलवरील कार्यक्रमाचे ई-मेल किंवा एसएमएस अलर्ट िमळाले तर?



झिप-ए-झॅप या अॉनलाईन टीव्ही गाईडचा वापर करून तुम्ही तब्बल ३०० भारतीय टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमांचे प्रोग्राम गाईड्स पाहू शकता आणि त्यावरील कार्यक्रमांसाठी ई-मेल किंवा एसएमएस अलर्ट मागवू शकता. डीटीएच प्रमाणे या साईटवर चॅनेल्सचे वगर्गीकरण केलेले आहे. तुम्ही या सर्व चॅनेलवरील पुढील सात दिवसांचे कार्यक्रम पाहू शकता. एकाच वेळी इतर चॅनेलवर कोणते कार्यक्रम सुरू असतील याची माहिती मल्टी-चॅनेल ग्रिडमध्ये पाहता येईल. एकावेळी एकच चॅनेलवरील कार्यक्रमांची माहितीही पाहता येते. एक्स्प्लोअरर व्ह्यूमध्ये कॅटेगरीवाईज चॅनेल्सची लिस्ट डिस्प्ले होतात. यावरील विविध सुविधा वापरण्यासाठी अगोदर रजिस्टर व्हावे लागते. रजिस्ट्रेशननंतर तुम्ही आवडते चॅनेल सिलेक्ट करून त्यावरील कार्यक्रमांची लिस्ट पाहू शकता. त्यावरील एखाद्या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कार्यक्रमावर क्लिक करा. त्यासंदभर्भातील माहिती एका स्वतंत्र विंडोत डिस्प्ले होईल. हा कार्यक्रम तुम्ही फेव्हरेट लिस्टमध्ये अॅड करू शकता किंवा त्यासाठी ई-मेल किंवा एसएमएसवरून अलर्ट मागवू शकता.



(या साईटवरून दिले जाणारे एसएमएस अलर्ट्स मिळण्यात अडचणी येतात, असे माझे निरीक्षण आहे. ई-मेल अलर्ट्स मात्र नियमित मिळतात.)
Read the full story

,

अॉनलाईन कीनोट!

September 8, 2008 0 comments



मायक्रोसॉफ्ट अॉफिसप्रमाणे मॅकिन्तोशचे आयवर्क हे सॉफ्टवेअर प्रचलित आहे. आयवर्कमध्ये पेजेस, नंबर्स आणि कीनोट ही तीन अॅप्लीकेशन्स वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंटचे काम करतात. यातील कीनोट हे अॅप्लीकेशन प्रोफेशनल प्रेझेंटेशन्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरते. कीनोटमध्ये तयार केलेले प्रेझेंटेशन तुम्ही विविध फॉरमॅट्समध्ये (पीपीटी, पीडीएफ, फ्लॅश आदी) एक्स्पोर्ट करून सेव्ह करू शकता. याचा इंटरफेसही पॉवरपॉईंटपेक्षा अधिक सोपा आहे. कीनोटमध्ये प्रेझेंटेशन तयार करणे हा एक सुखद अनुभव असतो. कीनोट हे केवळ मॅकिन्तोश अॉपरेटिंग सिस्टिमवरंच वापरता येते. त्यामुळे विंडोज वापरणाऱ्यांना कीनोटचा अनुभव घेता येत नाही. पण अॅपलमधील दोन सहकाऱ्यांनी स्वतःची कंपनी काढून एक नवी सेवा लॉंच केली आहे. ही सेवा वापरून तुम्हीदेखील कीनोटचा अनुभव घेऊ शकाल.



२८० स्लाईड्स
हे त्या सेवेचे नाव. अॉनलाईन प्रेझेंटेशन टूल्सच्या यादीतली ही तिसरी सेवा. कीनोटशी मिळतीजुळती असल्याने अल्पावधीतच ही सेवा लोकप्रिय झाली. याअगोदर एम्प्रेसर आणि स्लाईडरॉकेट या दोन सेवा अशाच प्रकारचे काम करत होत्या. या सेवांची फारशी चर्चा झाली नाही. २८० स्लाईड्स वापरण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर तुम्ही थेट प्रेझेंटेशन तयार करू शकता. यासाठी अनेक थीम्सही उपलब्ध आहेत. २८० स्लाईड्समध्ये तयार केलेले प्रेझेंटेशन तुम्ही अॉनलाईन स्टोअर करू शकता, स्लाईडशेअरसारख्या साईटवर शेअर करू शकता आणि अॉनलाईन प्रेझेंटही करू शकता. २८० स्लाईड्समध्ये तुम्ही अगोदर तयार केलेले प्रेझेंटेशन्स इम्पोर्ट करून एडिटही करू शकता. कीनोटचा अनुभव घ्यायचा असेल तर २८० स्लाईड्स एकदा वापरून पाहाच!
Read the full story

,

क्रोम शांती क्रोम!

September 5, 2008 3 comments



गुगलच्या क्रोम या नव्या ब्राऊजरबद्दल तुम्ही एव्हाना एेकले किंवा वाचले असेल. विंडोज अॉपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्यांनी तर ते वापरूनदेखील पाहिले असेल. गुगल क्रोम लॉंच होऊन आज चार दिवस झाले. माझ्याकडे अॅपल मॅकबुक असल्याने मी अद्याप ते वापरू शकलेलो नाही. मॅकिन्तोश आणि लिनक्ससाठीचे व्हर्जन लवकरात लवकर लॉंच करणार असल्याचे गुगलने कन्फर्म केले आहे. माझ्या ज्या सहकाऱ्यांनी क्रोम वापरून पाहिले आहे, त्यातील बहुतेक सवर्वांच्या पसंतीस ते खरे उतरले आहे. बहुतांश ब्लॉगर्सनेदेखील क्रोमचे भरभरून कौतुक केले आहे. क्रोमच्या बीटा लॉंचमुळे ब्राऊजरमधील स्पधर्धा अधिकच तीव्र होणार, हे स्पष्ट आहे. क्रोमची थेट स्पर्धा इंटरनेट एक्स्प्लोअरर आणि मोझिला फायरफॉक्सशी असेल. वेबसर्फरला कमीत कमी कष्टांत अधिक सोयी मिळतील याचा विचार करून सुधारित फायरफॉक्स ३ नुकतेच लॉंच झाले आहे. मायक्रोसॉफ्टनेही इंटरनेट एक्स्प्लोएरर ८ चे बीटा व्हर्जन बाजारात आणले आहे. स्पीड आणि मेमरी युसेज या निकषांवर क्रोम या दोन्ही ब्राऊजर्सना मागे टाकत असल्याचे विविध ब्लॉगर्सने केलेल्या चाचण्यांवरून पुढे आले आहे.



बीटा लॉंच असल्यामुळे अनेक प्रोफेशनल टेक्नॉलॉजी ब्लॉगर्स आणि मीडिया रायटर्स याविषयी उघड भाष्य करीत नाहीयेत. विविध ब्लॉगवर क्रोमबाबत सुरू असलेली चचर्चा अशीः
- विविध अॅड-अॉन्स किंवा एक्स्टेंशन्समुळे फायरफॉक्स आघाडीवर राहण्याची शक्यता आहे.
जगातील सुमारे ८० टक्के वेबसर्फर्स इंटरनेट एक्स्प्लोअरर वापरतात. या सगळ्यांना आपल्याकडे खेचून घेण्यास गुगल क्रोमला निश्चितंच काही कालावधी लागणार. गुगलने सर्च इंजिनच्या स्पधर्धेत याहूला ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने मागे टाकले, त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

-बॅक टू बेसिक्स अशा प्रकारचे साधे-सोपे ब्राऊजर असल्याने अधिक वेगाने लोकप्रिय होण्याची शक्यता.
सर्वसामान्य वेबयुजरच्या प्रत्येक टप्प्यावर अापली गरज निमर्माण करणाऱ्या गुगलतफर्फे लवकरच मोबाईल अॉपरेटिंग सिस्टिम (अॅंड्रॉईड) लॉंच केली जाणार आहे. अॅंड्रॉईडच्या माध्यमातून क्रोम अधिक लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयफोनलाही धोका संभावतो.

-वेबसर्फरसाठीचे प्रायमरी ब्राऊजर होण्यासाठी अतिशय सिंपल इंटरफेस ही क्रोमची ताकद ठरू शकते आणि त्यापासूनच सवर्वांत मोठा धोकाही संभावतो. First Impression कितीही चांगले असले तरी प्रायमरी ब्राऊजर होण्याइतपत पॉवरफुल फीचर्स गुगल क्रोमच्या बीटा व्हर्जनमध्ये नाहीत.

-हीच बाब टूलबारसाठीही लागू पडते. टूलबार असणे सोयीचे की नसणे, हे फायनल व्हर्जनमध्ये आपल्याला कळेल.

-गुगल क्रोमची जी वैशिष्ट्ये गुगलने हायलाईट केली आहेत त्यातील बहुतेक सर्व वैशिष्ट्ये विविध एक्स्टेंशन्सच्या रूपाने फायरफॉक्समध्ये उपलब्ध आहेत. लाईफहॅकरने याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.

गुगल क्रोमबद्दल आणखीही बरेच लिहिले जाईल, टीका होईल, अडचणी समोर येतील. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की हे बीटा व्हर्जन आहे. त्यामुळे अंतिम व्हर्जन येईपर्यंत ‘क्रोम शांती क्रोम’ एवढेच आपण म्हणू शकतो.
तुमचे गुगल क्रोमबाबत काय मत आहे?
Read the full story