ग्रुप मेल पाठविण्यासाठी...
एखादे ई-मेल पाठविताना आपण सहसा त्या विषयाशी संबंधित असलेल्या काही जणांना ‘सीसी’ करतो. संबंधित लोकांचे असे अनेक ग्रुप असतात. फॉरवर्ड करतानाही आपण ठराविक ग्रुपलाच मेल फॉरवर्ड करतो. म्हणजे काही मेल फक्त मित्रांना, काही फक्त मैत्रिणींना, काही शाळेतल्या मित्रांना, काही कॉलेजच्या ग्रुपला, काही अॉफिसमधील सहकाऱ्यांना वगैरे. असे अनेक ग्रुप झाले की मेल पाठविताना सगळ्यांचे मेल आयडी लक्षात ठेवावे लागतात. बहुतांश सर्वच मेल सेवांमध्ये पहिली काही अक्षरे टाईप केली की त्याने सुरू होणारे ई-मेल आयडी दिसतात व त्यातील आयडी आपण सिलेक्ट करू शकतो. तरीदेखील एखाद्या ग्रुपला मेल पाठविताना त्रास होतो. अशावेळी आपण ग्रुप तयार करून ठेवू शकतो. जी-मेल आणि याहूमेलमध्ये अशी सेवा आहे.
जी-मेलमध्ये ग्रुप तयार करण्यासाठी डाव्या बाजूच्या नेव्हीगेशन पॅनलमध्ये असलेल्या कॉन्टॅक्ट्सवर क्लिक करावे. त्यात न्यू ग्रुप असा अॉप्शन असेल. त्यावर क्लिक करून तुमच्या नव्या ग्रुपला एखादे नाव द्या (उदा. Friends, Schoolmates, College Group, HR वगैरे). त्यानंतर कॉन्टॅक्ट्स या सेक्शनमधील पहिल्या कॉलममध्ये तुमच्या ग्रुपचे नाव तुम्हाला दिसेल. ते सिलेक्ट करून तुम्हाला यात जे ई-मेल अायडी अॅड करायचे असतील ते दुसऱ्या कॉलमच्या तळाशी असलेल्या
या बॉक्समध्ये जाऊन टाईप करा. ते ई-मेल आयडी तुम्ही सिलेक्ट केलेल्या ग्रुपमध्ये अॅड होतील. आता तुम्हाला ज्यावेळी एखाद्या ग्रुपला ई-मेल पाठवायचा असेल त्यावेळी अॅड्रेस बॉक्समध्ये केवळ ग्रुपचे नाव लिहायचे.
याहू मेलमध्ये कॉन्टॅक्ट्स या टॅबमध्ये जाऊन अॅड कॅटेगरीवर क्लिक करून तुम्ही एखादा ग्रुप तयार करू शकता. त्यानंतर तुम्हाला ज्यांना या कॅटेगरीत अॅड करायचे आहे त्यांच्यासमोरील बॉक्समध्ये चेक करून अॅड टू कॅटेगरी म्हणायचं. संबंधित कॉन्टॅक्ट्स सिलेक्ट केलेल्या कॅटेगरीत अॅड होतील.
Read the full story
Hot Launches!